top of page
Search

टीसीएस (Tax Collected at Source) का काटला जातो?

  • taxme1
  • Jul 16, 2024
  • 2 min read

टीसीएस म्हणजे सोर्सवरून वसूल केलेला कर. जेव्हा आपण काही ठराविक वस्तू किंवा सेवा खरेदी करता, तेव्हा विक्रेता आपल्या कडून हा कर वसूल करतो आणि तो कर सरकारकडे भरतो. गाड्या खरेदी करताना, जेव्हा आपण एक ठराविक रकमेपेक्षा जास्त किमतीची गाडी खरेदी करता, तेव्हा विक्रेत्याला टीसीएस वसूल करणे बंधनकारक असते. याचा मुख्य उद्देश म्हणजे कर चोरीला आळा घालणे आणि करदात्यांची संख्या वाढवणे.


टीसीएस कशामुळे काटला जातो?


टीसीएस खालील गोष्टींसाठी काटला जातो:

1. उच्च किमतीच्या गाड्या: नवीन गाडी खरेदी करताना, जिची किमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असते.

2. सोन्याचे दागिने: जेव्हा आपण 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी करता.

3. अन्य उच्च किमतीच्या वस्तू आणि सेवा: काही अन्य वस्तू व सेवांसाठी देखील टीसीएस लागू होतो.

4. विदेशी प्रवास पॅकेज खरेदी

5. वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी (₹50 लाखांपेक्षा जास्त)

6. अल्कोहोलची खरेदी (होलसेल)

7. खनिज आणि कोळसा खरेदी


टीसीएस परत कसा मिळवायचा?


1. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरावे: सर्वप्रथम, आपण आपले इन्कम टॅक्स रिटर्न भरावे लागते. टीसीएस परत मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे.

2. फॉर्म 26AS तपासावा: फॉर्म 26AS हा आपल्या टीडीएस आणि टीसीएसचे तपशील दर्शवणारा दस्तऐवज आहे. आपला टीसीएस फॉर्म 26AS मध्ये दाखल झालेला असावा लागतो.

3. सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करा: आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये टीसीएसचा उल्लेख करावा आणि त्याची योग्य माहिती प्रविष्ट करावी.

4. प्रोसेसिंग: एकदा रिटर्न सबमिट केल्यानंतर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तो प्रोसेस करेल आणि योग्य असल्यास आपला टीसीएस रक्कम परत दिली जाईल.


नियम व अटी:


1. पॅन नंबर अनिवार्य: टीसीएस परत मिळवण्यासाठी आपल्याकडे पॅन नंबर असणे आवश्यक आहे.

2. फॉर्म 26AS मध्ये टीसीएसचा उल्लेख असणे गरजेचे: फॉर्म 26AS मध्ये आपला टीसीएस दाखल झालेला असावा लागतो.

3. संपूर्ण रिटर्न फॉर्म भरावा: आपल्या इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करावी.


महत्त्वाचे मुद्दे:

  1. टीसीएस दर व्यवहाराच्या प्रकारानुसार बदलतो (सामान्यतः 0.1% ते 5%)

2. काही व्यवहारांसाठी टीसीएस थ्रेशोल्ड आहे

3. पॅन कार्ड नसल्यास उच्च दराने टीसीएस कापला जाऊ शकतो

4. टीसीएस रक्कम आपल्या एकूण कर दायित्वातून वजा केली जाते

5. टीसीएसच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात, म्हणून


अधिक माहितीसाठी व मदतीसाठी आपण आमच्याशी संपर्क करू शकता.


📞 9860599537


 
 
 

Recent Posts

See All

Comments


© 2023 by PRAVIN PATIL

bottom of page